संपादकीय हृद्दगत
महर्षि डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या ‘समःसमेन शमयति’ तत्व प्रणालीशी एकरूप होऊन, समचिकित्सेशी इमान शाबूत ठेऊन ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ध्येय धोरण ठेऊन ‘सेवका सतत जळत तू रहा’ ह्या उक्ति प्रमाणे तहहयात रुग्ण सेवेचा वसा चालवून,समर्पित जीवनाची काल क्रमणा करणारा ज्ञानयोगी कर्मयोगी धन्वंतरी भिषग्वर नामवंत समचिकित्सक बहुजन समाज भूषण तीर्थ स्वरुप डॉ. अरुणकुमार शामरावजी ढोले उपाख्य बाबासाहेबाच्या निधनाने समचिकित्सा अंतराळातील चिकित्सेचा सखोल गाढा अभ्यासू,प्रकांड पंडीत,विदवत्तेने चमकणारा जणू दैदिप्यमान चिकित्सक सूर्यच मावळला. डॉ.बाबासाहेबांच्या महानिर्वाणाने चिकित्सा परिसराची फुलबाग जळून खाक झाली.माळरान ओस पडले.विराण झाले.अरिष्ट कोसळले.समाज एका दिलदार पण शिस्तीच्या कर्मठ सिद्धहस्त स्वस्ति श्री ढोले कुलवंत मूर्तिमंत यशवंत गुणवंत शिलवंत चिकित्सक शिरोमणीला मुकला,पारखा झाला. बाबासाहेबांच्या रूपाने होमिओपॅथी नावेचा सुकाणू सावरणारा नाविकच कालप्रवाहात वाहून गेला.बाबासाहेबांची उर्वरित जबाबदारी अन् रूग्णसेवेचा घेतलेला वसा अन् वारसा अंगीकारलेल्या,बाबासाहेबांचे रिक्त झालेले सुकाणू सावरायला धजावलेल्या जोमाने सरसावलेले पितांश्रीच्या कर्तुत्वाने भारावलेला वारसदार डॉ.श्रीरंग सारख्या अंगी मर्दहस्त स्फुलिंग असलेल्या तडफदार,जोमदार,दमदार नव नवाडयाला प्रोत्साहन पर सक्रीय सहकार्याची भक्कम साथ देऊन साकार करणे.होमिओपॅथीच्या विकासाने त्यांचे अपेक्षित कार्य नेटाने पुढे नेणे हीच त्यांना वाहिलेली खरी खुरी आदरांजली,भाव पुष्पांजली,श्रद्धांजली ठरावी. The Show must go on. कालप्रवाहात सर्वसाधारण सामान्य माणसाचे तारुण्य,असलेच तर लावण्य,ऐश्वर्य मानसंन्मान अन् अखेर सारे आयुष्यच वाहून जाते.
जनसेवेचे बांधुनी कंकण | झिजती चंदन सम जे कणकण || बहुजन सुखाय बहुजन हिताय | समर्पिती जे त्यागी जीवन ||
अशा बाबासाहेबा सारख्या ‘समःसमेन शमयति’ शास्त्र शुद्ध तत्वावर आधारित ‘स्वल्पमोली बहुगुणी’ गोड होमिओपॅथीच्या माध्यमातून तहहयात रूग्णसेवेचे असिधारा व्रत घेतलेल्या असामान्य कर्त्या पुरुषाची कर्तबगारी अन जनसामान्यांच्या कल्याणार्थ वेचलेला प्रत्येक क्षण नि क्षण, अविस्मरणीय घटना,घडविलेल्या भव्य दिव्यं वास्तुशिल्प व इतर भौतीक,अभौतीक सत्कृती चिरंतर दरवळत राहतात स्मृतिगंधाच्या रूपाने अन सुगंधहि कसा? अगदी कवठी सोन चाफ्याचा जसा.आजही बाबासाहेबाची ती भव्य दिव्यं गोरी गोमटी धीरोदात्त मूर्ती मनःचक्षू पटलावर उभी राहिली की भूतकाळातील रागाच्या लोभाच्या मायेच्या गडद सावल्या अद्यापही पाठराखण करतात.आठवणीचा बांध फुटतो.अथक परिश्रम,तीक्ष्ण कुशाग्र बुद्धी प्रखर व्यवहार कुशलता. व शीघ्रनिर्णय क्षमता असलेल्या संघर्षमय मर्दहस्त झुजांर सत्याग्रही स्पुलिंगाचे निमालेले पर्व देऊन जाते चैतन्य,स्पूर्ति उत्साह अन प्रेरणा मोह धामा वरील विझलेल्या रक्षेतूनही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे जिवंत होतात त्यांच्या अविस्मरणीय स्मृती बडनेरा रोड वरील विशाल होमिओपॅथीक कॉलेज कॅम्पस त्याच्या वास्तूपूजनासाठी बाबासाहेबांनी मनात आणले असते तर प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी कोणत्याही उद्घाटनासाठी सरसावणार्या नेत्यांच्या ह्या जमान्यात अंबापुरी ते मुंबापुरी व दिल्लीतील कोणत्याही V.I.P ला निमंत्रण दिले असते तर ते आनंदाने आले असते.पण त्यांनी ना सत्ता ना संपत्ती अशा आपल्याच संस्थेतील वयोवृद्ध श्री सुखदिन बाबा व श्री करीम भाई या चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना नवीन वस्त्र प्रावरणे देऊन गळ्यात पुष्पमाला घालून त्यांचा कष्टाळू हस्ते पूजन केले.त्यांचा यथोचित सन्मान केला.सामान्यांना अग्र आध्य पूजेचा बहुमान देऊन त्यांच्याशी जवळीक साधणारा भावनिक प्रसंग बाबा सामान्य माणसांना विसरले नाहीत. हे सिद्ध करीत नाही काय?सामन्यातील असामान्यत्व पारखून त्यांचा आदर करणे ह्यातच बाबांच्या विशाल हृद्याचा प्रामाणिकपणा अन थोर मनाचा साक्षात्कार घडून येत नाही काय? श्रीफळाची नारवटी वरून कितीही कडक असली तरी त्यात स्न्हीग्धतेने भरलेला केवढा तरी गोड खोबऱ्याचा डौल असतो नाही का?Heroes of the day men of the match.ह्या भावनेने त्या दोघांचे चेहर्यावर ओसंडणारा आनंद.त्यांचे अग्रक्रमाने बाबासाहेबांच्या ह्या अभिनव पायंडयाची उद्घाटन करवून घेणार्यांनी नोंद घ्यावी स्व. बाबासाहेबाच्या प्राचार्यपद कारकिर्दीत होमेओपॅथिक अॅन्ड बायोकेमीक कॉलेजचा मी विद्यार्थी म्हणून ज्ञानार्जन आणि प्राध्यापक म्हणून ज्ञानार्पण करतांना यशस्वी जीवनाची वाटचाल सुरु केली.माझ्याच नव्हे तर अशा असंख्य यशस्वी चिकित्सकांच्या वैभवाचे बाबा मानकरी ठरावेत.भाग्य विधाता ठरावेत. आदरणीय बाबासाहेबाचे ज्ञान सदवार्तात आकंठ ज्ञान ग्रहण करून अन ज्ञान पाणपोईत ज्ञानामृतप्राशन करून तृप्त मनाने महाविद्यालयाचे बाहेर पडतांना भावी जीवनासाठी बांधून घेतलेली शिदोरी जीवनभर जोपासावी.हि स्व.डॉ.बाबासाहेब जीवन पुष्प स्मृतीगंध वाटिका सर्वांग सुंदर करण्याचे श्रेय लेखक,शब्दसाज चढविणारा चित्रकार. स्मृती कलश सर्वांग सुंदर कर्त्याचे आभार मानायला हवेतच का? त्यांचे आमचे ॠणाईत भावनेने.जगन्नाथी रथ सर्वांच्याच सहकार्याने चालत असतो ,एकट्याच्या नव्हे,म्हणून माझ्या संपादनाच्या कर्तव्याला कसली आली आहे परिश्रमाची संज्ञा!
ध्यान मुलं गुरुर्मुर्ती पूजा मूलं गुरुरपदम शास्त्र मूलं गुरुर्वाक्याम मोक्ष्य मुलं गुरुर्कृपा
गुरुवर्य स्व.डॉ.बाबासाहेबाच्या गुरुकृपाप्रसादाणासाठीच केला आहे हा अट्टाहास ‘स्मुर्तीकलश’ गोड व्हावा म्हणून.-वाचक रसिक वृद्धहो- न्यून ते पुरते,अधिक ते सरते गोड करुनी घेयावे ते तुमते विनवितसे!
डॉ. जयकृष्ण अ. रोडे संपादक